शिष्यवृत्ती परीक्षा 2027 अधिसूचना जाहीर : 30 नोव्हेंबरपूर्वी हे नक्की करा!

MEC Blog Banners - शिष्यवृत्ती परीक्षा 2027 अधिसूचना
इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 रविवार, 21 फेब्रुवारी 2027 रोजी होणार आहे. विलंब शुल्क टाळण्यासाठी 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी शाळेमार्फत अर्ज भरा. महत्त्वाच्या तारखा, शुल्क, पात्रता, परीक्षारचना आणि पालकांसाठी चेकलिस्ट या लेखात.

पालकहो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7वी) 2027 (Maharashtra Scholarship Exam 2027) ची अधिसूचना जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे.

अर्ज शाळेमार्फत भरला जातो, पण तो वेळेत भरला जाईल याची खात्री करणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. या लेखात अधिसूचनेतील महत्त्वाच्या सर्व गोष्टी सोप्या भाषेत दिल्या आहेत.

एका नजरेत : शिष्यवृत्ती परीक्षा 2027 (Maharashtra Scholarship Exam 2027)

तपशीलमाहिती
परीक्षाप्राथमिक (इ. 4थी) व उच्च प्राथमिक (इ. 7वी) शिष्यवृत्ती परीक्षा
आयोजकमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
परीक्षा दिनांकरविवार, 21 फेब्रुवारी 2027 (राज्यभर एकाच दिवशी)
पेपर-1सकाळी 11:00 ते 12:30
पेपर-2दुपारी 2:00 ते 3:30
प्रश्नांचे स्वरूपसर्व प्रश्न बहुपर्यायी (4 पर्याय), OMR उत्तरपत्रिका
अर्ज पद्धतऑनलाइन, फक्त शाळेमार्फत (ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत)
अधिकृत वेबसाइटpuppssmsce.in / mscepune.in

अर्ज भरण्याच्या महत्त्वाच्या तारखा

टप्पाकालावधी
नियमित शुल्कासह27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026
विलंब शुल्कासह (+ ₹50 विलंब शुल्क)1 ते 15 डिसेंबर 2026
अतिविलंब शुल्कासह (+ ₹50 विलंब शुल्क + ₹10 प्रतिदिन / प्रति विद्यार्थी)16 ते 23 डिसेंबर 2026
अतिविशेष विलंब शुल्कासह (+ ₹50 विलंब शुल्क + अतिविलंब शुल्क + ₹20 प्रतिदिन / प्रति विद्यार्थी)24 ते 31 डिसेंबर 2026

⚠️ 31 डिसेंबर 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही.

💡 पालकांसाठी सल्ला: 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे म्हणून थांबू नका. उशिराच्या अर्जाला दररोज जास्त शुल्क लागतं. तसेच ज्या शाळांचं शुल्क जिल्हा परिषद सेसफंड / मनपा निधीतून भरलं जातं, त्यांना ही सुविधा फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत आहे — त्यानंतरचं विलंब शुल्क शाळेला स्वतः भरावं लागतं. म्हणून 30 नोव्हेंबरपूर्वीच अर्ज पूर्ण करा.

परीक्षा शुल्क (नियमित मुदतीत)

शुल्कबिगरमागास (SBC, OBC, OPEN)मागास प्रवर्ग / दिव्यांग
प्रवेश शुल्क₹50₹50
परीक्षा शुल्क₹150₹75
एकूण₹200₹125
  • मागास प्रवर्ग सवलत (SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D) फक्त महाराष्ट्र शासनाचा (MSCERT) अभ्यासक्रम असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना लागू आहे. CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही सवलत नाही.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये सवलत आहे.
  • SBC, OBC व OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क (₹200) भरावं लागेल.

कोण परीक्षा देऊ शकतो? (पात्रता)

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 4थी किंवा 7वी मध्ये शिकत असावा.
  • कमाल वयोमर्यादा (1 जून 2026 रोजी):
परीक्षासर्व प्रवर्गदिव्यांग
इयत्ता 4थी10 वर्षे14 वर्षे
इयत्ता 7वी13 वर्षे17 वर्षे

⚠️ वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेला विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो, पण त्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळणार नाही. शाळेच्या रजिस्टरमधील जन्मतारीख अर्जात अचूक नोंदवली आहे याची खात्री करा — चुकीच्या जन्मतारखेमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो.

  • CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. त्यांची राज्यस्तरीय (पहिले 100) व जिल्हास्तरीय (प्रत्येक जिल्ह्यात पहिले 25) स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार होते आणि प्रमाणपत्र दिलं जातं, परंतु त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही.
  • विदर्भातील 11 जिल्ह्यांतील पालकांचे, तसेच भूमिहीन शेतमजूर पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 पेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र आवश्यक आहे.

परीक्षारचना

पेपरविषयप्रश्नगुण
पेपर-1प्रथम भाषा (मराठी / इतर)2550
पेपर-1गणित50100
पेपर-2तृतीय भाषा (इंग्रजी)2550
पेपर-2बुद्धिमत्ता चाचणी50100
एकूण150300

👉 बुद्धिमत्ता चाचणीला तब्बल 100 गुण आहेत. त्याची घरी तयारी कशी करावी यावर आमचा सविस्तर लेख वाचा : [बुद्धिमत्ता चाचणी : पालक घरी कशी तयारी करून घेऊ शकतात? — link add करा]

शिष्यवृत्ती किती मिळते?

दि. 17/10/2025 च्या शासन निर्णयानुसार पात्र विद्यार्थ्यांना 3 वर्षांसाठी दरमहा शिष्यवृत्ती मिळते:

इयत्ताशिष्यवृत्तीकालावधी
इयत्ता 4थी₹500 दरमहा3 वर्षे
इयत्ता 7वी₹750 दरमहा3 वर्षे

शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.

पण खरं सांगायचं तर, या परीक्षेचा फायदा फक्त पैशांपुरता मर्यादित नाही. स्पर्धा परीक्षेचा पहिला अनुभव, वेळेचं नियोजन, तर्कशक्ती आणि आत्मविश्वास — हे मुलाला पुढे NMMS, Olympiad आणि MHT-CET/JEE/NEET पर्यंत उपयोगी पडतं.

पालकांसाठी चेकलिस्ट : आजच हे करा

  • शाळेत विचारा — आमच्या मुलाचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरला का?
  • मुलाचं वय वयोमर्यादेत बसतं का ते जन्मदाखल्यावरून तपासा.
  • मुलाचा आधार क्रमांक (किंवा आधार नोंदणी क्रमांक) शाळेला द्या; आधारवरील नाव व शाळेच्या नोंदीतील नाव एकसारखं आहे का ते पहा.
  • मुलाचा फोटो व स्वाक्षरी एकाच कागदावर घेऊन त्याचं एकत्रित स्कॅन (jpg/jpeg/png/bmp, 100 KB पेक्षा कमी) तयार ठेवा.
  • मुलाचा प्रवर्ग (शुल्क सवलतीसाठी) व लागू असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र / उत्पन्न प्रमाणपत्र (विदर्भ / भूमिहीन शेतमजूर) शाळेला द्या.
  • परीक्षेचं माध्यम (मराठी / Semi-English / इतर) योग्य निवडलं आहे याची खात्री करा.
  • अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत / स्क्रीनशॉट शाळेकडून मागून घ्या.
  • 21 फेब्रुवारी 2027 ही तारीख कॅलेंडरवर खूण करा आणि तयारीचं नियोजन आजपासून सुरू करा.

अर्ज तर झाला, आता तयारीचं काय?

अर्ज भरल्यानंतर साधारण 3 महिने हातात उरतात. या काळात नियोजनबद्ध अभ्यास केला तर मुलं merit list मध्ये येऊ शकतात:

  • नोव्हेंबर – डिसेंबर: सर्व विषयांचा पाया पक्का करा, विशेषतः गणित व बुद्धिमत्ता चाचणी.
  • जानेवारी: आठवड्याला किमान एक मॉक टेस्ट आणि चुकांचं विश्लेषण.
  • फेब्रुवारी: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवणे (पेपर-1 व पेपर-2 प्रत्येकी 90 मिनिटे) आणि OMR उत्तरपत्रिका भरण्याचा सराव.

📝 OMR बाबत लक्षात ठेवा (अधिसूचनेनुसार): उत्तरपत्रिकेत गिरवलेली / खाडाखोड केलेली उत्तरे ग्राह्य धरली जात नाहीत, एकदा नोंदवलेलं उत्तर बदलता येत नाही, आणि पेन्सिलने वर्तुळ रंगवल्यास शून्य गुण मिळतात. त्यामुळे घरीच OMR सरावाची सवय लावा.

दैनंदिन अभ्यासाचं नियोजन हवं असेल तर आमचा लेख वाचा : [दैनंदिन अभ्यास वेळापत्रक — link add करा]

My Exam Coach सोबत तयारी करा

My Exam Coach च्या इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती कोर्समध्ये मराठी व Semi-English माध्यमातून Live + Recorded तासिका, नियमित मॉक टेस्ट, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि अनुभवी शिक्षकांकडून doubt-clearing मिळतं. मुलाला घरबसल्या संपूर्ण तयारी — आणि एकही तास चुकणार नाही.

👉 आजच आपल्या मुलासाठी शिष्यवृत्ती तयारी कोर्स घ्या : https://myexamcoach.in/scholarship-preparation-course/

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न: पालक स्वतः ऑनलाइन अर्ज भरू शकतात का? उत्तर: नाही. अर्ज शाळेमार्फत भरला जातो. पालकांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत शाळेला द्यावी.

प्रश्न: शिष्यवृत्ती परीक्षा 2027 कधी आहे? उत्तर: रविवार, 21 फेब्रुवारी 2027 रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी.

प्रश्न: अर्जाची शेवटची तारीख कोणती? उत्तर: नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबर 2026. विलंब शुल्कासह टप्प्याटप्प्याने 31 डिसेंबर 2026 पर्यंत.

प्रश्न: Semi-English माध्यमाच्या मुलांना कोणत्या माध्यमात पेपर द्यायचा? उत्तर: अर्ज भरतानाच परीक्षेचं माध्यम निवडावं लागतं. “मराठी + इंग्रजी” (सेमी इंग्रजी) पर्याय निवडल्यास पेपर-1 मधील गणित आणि पेपर-2 मधील बुद्धिमत्ता चाचणी यांच्या प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून मिळतात. त्यामुळे माध्यम निवडताना शाळेशी चर्चा करा.

प्रश्न: CBSE / ICSE शाळेतील मुलं परीक्षा देऊ शकतात का? उत्तर: हो. त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार होते आणि प्रमाणपत्र मिळतं, पण शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही.

प्रश्न: शिष्यवृत्ती किती मिळते? उत्तर: इयत्ता 4थी साठी ₹500 दरमहा व इयत्ता 7वी साठी ₹750 दरमहा, 3 वर्षांसाठी. त्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण आवश्यक आहेत.


हा लेख उपयुक्त वाटला तर तुमच्या शाळेच्या पालकांच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की share करा — एखाद्या मुलाचा अर्ज वेळेत भरला जाईल!

Source: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे — शिष्यवृत्ती परीक्षा 2027 अधिसूचना. अंतिम व अधिकृत माहितीसाठी puppssmsce.in पहा.

Share the Post: